Yuva maratha news
परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील मतदान केंद्रावर तुफान राडा
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
परळी दि: २० नोव्हेंबर २०२४ रोजी परळी मतदार संघातील धर्मापुरी येथील मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने येथे मोठा राडा झाला आहे. याचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून बोगस मतदानाचा आरोप करण्यात येत आहे. अँड.माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली हा व्हिडिओ सर्व दूर व्हायरल झाला आहे. परळी विधानसभा मतदारसंघ संवेदनशील मानला जात असून, प्रत्येक निवडणुकीत येथील विविध चर्चा रंगत असतात तर लोकसभा निवडणुकीतही परळी मतदारसंघ चर्चेत आला होता. या विधानसभा निवडणुकीतही सकाळीच परळी मतदारसंघ चर्चेत आला. या मतदारसंघातील धर्मापुरी येथील मतदान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. हा प्रकार लक्षात येताच येथे मोठा राडा झाला. यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मतदार केंद्राला भेट दिली आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी राजसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा राडा झाला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केल्याने वातावरण शांत झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून बोगस मतदान करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर आता प्रशासन आणि निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अँड. माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.