Yuva maratha news
बीड जिल्ह्यातील मतदान केंद्रावर गैरप्रकार जिल्हा प्रशानाचा काना डोळा
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड दि: २० नोव्हेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकाराकडे पाठ फिरवत काना डोळा केल्याचे मत सामान्य जनतेतून येत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या मतदानात प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्या बातम्या सोशल मीडियावर आणि न्युज चॅनलवर दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी दिवसभर झळकत असताना बीड जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस प्रशासनाकडून या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पाठ फिरवत काना डोळा केल्याचे मत सामान्य जनतेतून येत आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर गैरप्रकार होत असताना स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भुमिका घेत काना डोळा करताना दिसत होते. परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील धर्मापुरी, घाटनांदूर, परळी वैजनाथ अशा अनेक ठिकाणी लोकशाहीची हत्या होताना दिसत होते. मतदारसंघात अनेक ठिकाणी उमेदवारांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली असून परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर येथे अज्ञात व्यक्तींनी ई.व्ही. एम. आणि पी.पी.टी मशीनची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनांमुळे परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरीकांमध्ये मात्र दहशत निर्माण झाली असून लोकांना भीतीपोटी दबावाखाली येऊन मतदान असल्याचे मत व्यक्त करताना दिसत होते. अशा अनेक दहशतवादी घटनांनी बीड जिल्हा हादरून गेला असून जिल्ह्यातील प्रशासनाने आणि पोलिस प्रशासनाने मात्र अशा घटनांची दखल घेतली नाही दरम्यान बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत झालेल्या घटनांची पुनरावृत्ती झाली आहे असे मत सामान्य जनतेतून येत आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणूकीत लोकशाहीची हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत लोकशाहीची हत्या करण्यात आली असल्याचे मत सर्व स्तरातून येत आहे.