आशाताई बच्छाव
महायुतीकडून जातीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न- आ. अमित देशमुख
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ- सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडाफोडीचे राजकरण करणाऱ्या महायुतीची नेते मंडळी पुढे सत्ता येणार नाही, या भीतीने जातीय ध्रुवीकरणाचे प्रयास करीत असून कोणत्याही भुलथापांना बळी न पडता जनतेने जालनेकरांच्या भवितव्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी आज येथे केले. आमदार कैलास गोरंट्याल व आपण स्वतः निश्चितपणे विजयाचा चौकार मारणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जालना विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ जालना शहरातील सुयेशा लाॅन्स येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर खासदार डॉ. कल्याण काळे, उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल, जालना लोकसभेचे पक्षनिरिक्षक डॉ. पी. सी. शर्मा, पक्षनिरिक्षक नामदेव पवार, आमदार राजेश राठोड, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र राख ,माजी आमदार संतोष सांबरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव कल्याण दळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख बाला परदेशी, रिपाइंचे ( गवई गट) जिल्हाध्यक्ष किशोर मघाडे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे,महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा पवार,मुरलीधर शेजूळ, शिवाजी शेजूळ, प्रभाकर पवार, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बदर चाऊस,कल्याण बोराडे, बाबुरावमामा सतकर, राम कुराडे,ॲड.सय्यद तारेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आमदार देशमुख पुढे म्हणाले की, आमदार कैलास गोरंट्याल हे मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाचे सर्वात सिनियर आमदार आहेत,