Home जालना निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ...

निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली मतमोजणी केंद्र व मतदान केंद्राची पाहणी

65

आशाताई बच्छाव

1000958780.jpg

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र आणि जिल्हा निवडणूक अधिकारी

डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली मतमोजणी केंद्र व मतदान केंद्राची पाहणी

 

      निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दिल्या सूचना

जालना, ( दिलीप बोंडे ब्युरो चीफ) :- 101 जालना आणि 102 बदनापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. वेद पती मिश्र आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज मतमोजणी केंद्र आणि मतदान केंद्राना भेट देवून पाहणी केली.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, 101 जालना विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार छाया पवार तर 102 बदनापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सरिता सुत्रावे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी डमरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी श्री. मिश्र आणि डॉ. पांचाळ यांनी 101 जालना विधानसभा मतदारसंघातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि 102 बदनापूर विधानसभा मतदार संघातील कृषि महाविद्यालय येथील मतमोजणी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी मतदान यंत्रे (इव्हीएम) सज्ज करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी उमेदवारांच्या नावासंदर्भात तपासणी करत एका मशीनवर ‘मॉकपोल’ करून व्हीव्हीपॅटद्वारे दिसणाऱ्या चिठ्ठीचीही खात्री करुन घेतली. तसेच स्ट्रॉन्ग रुमला भेट देवून रॅन्डमझायशेन प्रक्रियेनुसार मतदान यंत्रे (इव्हीएम) असल्याची देखील त्यांनी खात्री करुन घेतली.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर!
Next articleमहायुतीकडून जातीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न- आ. अमित देशमुख
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.