आशाताई बच्छाव
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल
जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर!
जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची काल जालन्यात जंगी सभा झाली आणि संपूर्ण वातावरण ृढवळून निघाल्याने त्यात बदल झाल्याचेही जाणवत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असून तो कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करतांनाच ते म्हणाले की, विरोधकांना केवळ आपल्यावर टिका केल्याचे समाधान वाटत असेल तर वाटू द्या, त्यांना आपले नांव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, याचाच अर्थ मतदारराजा हा आपल्या बाजूने उभा आहे, त्यांचा आशिर्वाद हा धनुष्यबाणालाच मिळणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्ष व महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार अर्जुन पंडितराव खोतकर यांनी विविध ठिकाणी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन मतदारांशी संवाद साधला.
श्री. अर्जुनराव खोतकर यांनी नुकत्याच जामवाडी, गोदेगांव, वंजार उम्रद, माळशेंद्रा, साळेगांव, शिवनगर, मयुर पार्क, सोरटी पार्क, कृष्णबन सोसायटीला भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना श्री. खोतकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची काल जालन्यात जंगी सभा झाली आणि संपूर्ण वातावरण ृढवळून निघाल्याने त्यात बदल झाल्याचेही जाणवत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असून तो कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करतांनाच ते म्हणाले की, विरोधकांना केवळ आपल्यावर टिका केल्याचे समाधान वाटत असेल तर वाटू द्या, त्यांना आपले नांव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, याचाच अर्थ मतदारराजा हा आपल्या बाजूने उभा आहे, त्यांचा आशिर्वाद हा धनुष्यबाणालाच मिळणार आहे. विद्यमान आमदाराने सत्तेवर असूनही कोणतीही कामे केली नाहीत. उलट आपण आणलेल्या कामांवर दावा केला जातो आहे.