Home बुलढाणा स्वराज्य पक्षाच्या उमेदवार प्रेमलताताई सोनोने यांच्या प्रचार रथाचे बॅनर फाडले विरोधकांच्या पायाखालची...

स्वराज्य पक्षाच्या उमेदवार प्रेमलताताई सोनोने यांच्या प्रचार रथाचे बॅनर फाडले विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली: आमचा विजय निश्चित….

71

आशाताई बच्छाव

1000958704.jpg

स्वराज्य पक्षाच्या उमेदवार प्रेमलताताई सोनोने यांच्या प्रचार रथाचे बॅनर फाडले विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली: आमचा विजय निश्चित….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- बुलडाणा स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रेमलताताई सोनोने यांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली असून प्रेमलता सोनोने यांच्या प्रचार रथाचे बॅनर फाडण्यात आले आहे. प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे माय बाप जनता माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आमच्यावर वार कसला करता आहे तर आमच्या प्रचाराचे बॅनर फाडत आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या
जिल्ह्यात महिलांचा सन्मान करायला पाहिजे हा माझा अपमान नाही बुलडाणा जिल्ह्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. छत्रपती संभाजीराजेंचा अपमान यांनी केला आणि याची शिक्षा ही जनता यांना दिल्याशिवाय राहणार नाही अश्या प्रेमलताताई सोनोने म्हणाल्या, आम्हाला धमक्या देतात आमचे बॅनर फाडतात एक रणरागिणी लढते आहे समोर येवून लढा कधी सांगता अर्ज मागे घ्या मात्र आम्ही कुटल्याच गोष्टीला जुमानल नाही म्हणून आता आमचे बॅनर फाडता आहे अश्याही त्या म्हणाल्या आमच्या प्रचारावर दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न चालू केला म्हणून आता बॅनर फाडले महायुती आणि महाविकास आघाडीने फक्त जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याच काम केलं आहे. आणि महाशक्ती परिवर्तन आघाडीचा तिसरा पर्याय जनतेच्या समोर दिला आहे जनतेने मतपेटीच्या माध्यमातून यांना उत्तर द्या असे आवाहन ही प्रेमलता सोनोने यांनी केले आहे. आमच्या वर कितीही दबाव आण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरून न जाता आणखी ताकदीने प्रचाराला उतरू आता विरोधकांच्या पायाखालची जमीन आता सरकली आहे आणि हाच आमचा विजयाचा रस्ता आहे.