Home बुलढाणा युवा मराठा खळबळजनक ब्रेकिंग वाघजाळ फाट्यावर पकडली एक कोटींची कॅश

युवा मराठा खळबळजनक ब्रेकिंग वाघजाळ फाट्यावर पकडली एक कोटींची कॅश

219

आशाताई बच्छाव

1000952047.jpg

युवा मराठा खळबळजनक ब्रेकिंग
वाघजाळ फाट्यावर पकडली एक कोटींची कॅश
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा : -बुलढाणा मलकापूर मार्गावरील वाघजाळ फाट्याजवळ आज दुपारच्या सुमारास एक कोटी रुपयांची कॅश पकडण्यात आली आहे. एवढी मोठी रक्कम पोत्यामध्ये भरून नेण्यात येत होती. नाकाबंदी दरम्यान एक संशयास्पद एरिटीका कार पोलिसांनी थांबविली. त्यात पोत्यामध्ये सुमारे 1 कोटी रुपये होते. चौकशी केली असता सदर रक्कम बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे त्याबाबतची अधिकृत चलान सुद्धा पोलिसांना दाखविण्यात आली. जळगांव जामोदच्या शाखेत व्यवहारासाठी सदर रक्कम मुख्य शाखेतून पाठविण्यात आली होती. जळगाव जामोद शाखेचे अधिकारी सहदेव डाबेराव यांनी अधिकृत कागदपत्रे दाखविल्यानंतर कार सोडण्यात आली. परंतु एक कोटीची कॅश मिळाल्याच्या
बातमी ने परिसरात खळबळ उडवून दिली होती.