आशाताई बच्छाव
सोनईत आनंदवन संस्थेच्या वतीने तेरा कुटुंबाची दिवाळी गोड
सोनई/ नेवासा (कारभारी गव्हाणे) सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या सोनई येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नातून व अहिल्यानगर येथील इंडियन डेंटल असोसिएशनच्या विशेष सहकार्यातून तेरा गरजू कुटुंबास साठ हजार रुपये किंमतीचे दिवाळी साहित्य भेट देवून आपुलकीचा भाव जपण्यात आला.सणाच्या पूर्वसंध्येला राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे.
प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी संस्था राबवित असलेल्या सामाजिक, धार्मिक,आरोग्य व पर्यावरण विषयी उपक्रमांची माहिती दिली.
आनंदवन संस्थेच्या ध्यानमंदीरात त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलचे संस्थापक साहेबराव घाडगे यांच्या हस्ते सर्व कुटुंबास किराणा,फराळ,साडी,कपडे व सणाचे सर्व साहित्य देण्यात आले. कृष्णाई आश्रमाचे गणेश महाराज नवले, गोविंद महाराज निमसे, उद्योजक सुदाम तागड, इंडियन डेंटलचे सदस्य डाॅ.प्रतिक अट्टल,आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक अॅड सुनिल गडाख, प्रशांत लालचंदानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख भाषणात साहेबराव घाडगे यांनी सामाजिक जाणीव ठेवून आनंदवन संस्था करीत असलेले कार्य खरोखर प्रेरणादायक असल्याचे सांगून माणुसकीचे प्रत्येक पाऊल समाजहित जोपासत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे सांगितले.कृष्णा सुद्रिक,सच्चिदानंद कुरकुटे, किशोर घावटे, संदीप घोलप, नवनाथ शिंदे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी चंद्रकांत आढाव,शहाराम तांदळे,अजित बडे,विकास भागवत,सुरेश वैरागर उपस्थित होते. गणेश हापसे यांनी सुत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी आभार मानले.
—————————————