Home जालना जळगाव सपकाळ येथे जुगार अड्डाचा सुळसुळाट.

जळगाव सपकाळ येथे जुगार अड्डाचा सुळसुळाट.

218

आशाताई बच्छाव

1000889523.jpg

जळगाव सपकाळ येथे जुगार अड्डाचा सुळसुळाट. तालुका प्रतिनिधी जाफराबाद … मुरलीधर डहाके….दिनांक 26/10/2024…… सविस्तर वृत्त असे की जळगाव सपकाळ परिसरात पत्त्याचा क्लब चालतो, लाखो रुपयाची उलाढाल,, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका पासून जवळच असलेले जळगाव सपकाळ येथे राजकीय आशीर्वादाने जुगार अड्डा चालतो, येथे रोजची लाखो रुपयाची उलाढाल होते, अशी चर्चा सर्वसामान्य नगरिका मध्ये आहे, या जुगारामुळे कित्येक तरुण हे कर्जबाजारी झालेले आहेत. काहींनी आपल्या शेती विकलेले आहेत, व्याजाने पैसे वाटणारी सावकार हे जुगार यांना जागेवरच पैसे देतात, व सदरील पैशाला हे हप्त्याच व्याज असते. त्यामुळे रक्कम तिप्पट होते, कित्येक लोक पैसे भरण्याचा समर्थ असल्यामुळे त्यांना आपली प्रॉपर्टी विकावी लागते, सदरील पत्त्याचा जुगार हा अनेक दिवसापासून चालू आहे, यावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, यावर नेमका कुणाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे, सदरील जुगार चालकावर कारवाई व्हावी अशी सर्वसामान्य मधून मागणी होत आहे, पोलिसांनी सुध्दा मोठ मोठे अवैद्य धंदे बंद केले परंतू जळगाव सपकाळ येथील जुगार अड्डा त्यांना दिसत नाही असे परिसरातील नागरीक बोलू लागले आहेत.