Home बुलढाणा पतीसोबत झालेल्या भांडणामुळे पत्नी घरातून बाहेर गेली आणि…

पतीसोबत झालेल्या भांडणामुळे पत्नी घरातून बाहेर गेली आणि…

121

आशाताई बच्छाव

1000811019.jpg

पतीसोबत झालेल्या भांडणामुळे पत्नी घरातून बाहेर गेली आणि…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-खामगाव तालुक्यातील टेम्भूर्णा गावातील पतीसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात घरुन निघून गेलेल्या विवाहितेचा मृतदेह शेलोडी शिवारातील पाझर तलावात आढळून आला आहे. तालुक्यातील ‘टेंभूर्णा’ शिवारातील गजानन मुकुंदा काळे यांच्या शेतात राहत असलेल्या मिरा गजानन बामणे वय २५ या विवाहितेचा पतीसोबत शाब्दीक वाद झाला होता. यामुळे सदर विवाहिता रागाच्या भरात घरुन निघून गेली होती. दरम्यान तिचा शोध घेतला असता शेलोडी शिवारातील पाझर तलावात मीरा बामणे हिचा मृतदेह मिळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Previous articleउमराणेत जी.पी.एस.लोकेशन आधारित पिकपहाणीचे प्रात्यक्षिक संपन्न
Next articleट्रॅक्टरवर मळणी यंत्रात हातातील कडा अटकल्याने युवकाचा पंजाच कटला; बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील घटना.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.