Home जालना पाथ्रीकर कॅम्पसच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कब्बडी स्पर्धेत बाजी

पाथ्रीकर कॅम्पसच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कब्बडी स्पर्धेत बाजी

90

आशाताई बच्छाव

1000809025.jpg

पाथ्रीकर कॅम्पसच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कब्बडी स्पर्धेत बाजी
बदनापूर, दि.४(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या
कब्बडी संघाने आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत बाजी मारली असून विद्यापीठात
हा संघ सर्वप्रथम आला आहे. ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने आपल्या
यशाची परंपरा कायम राखत मिळवलेल्या या यशाबद्दल संघाचे सर्वत्र कौतुक होत
आहे.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टद्वारे पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने कायम विविध क्रीडा प्रकारात
बाजी मारलेली आहे. या महाविद्यालयातील कब्बडी संघाने मागील अनेक
वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेली आहे. प्रत्येक
वर्षी या महाविद्यालयातील अनेक खेळाडू राष्ट्रीयस्तरावर चमकत असतात.
ग्रामीण भागात असलेल्या या महाविद्यालयाने संस्थेचे अध्यक्ष डॉ.देवेश
पाथ्रीकर व क्रीडा संचालक डॉ. एस. एस. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली
क्रीडा क्षेत्रात प्रचंड दबदबा निर्माण केलेला आहे. या वर्षीची आंतर
महाविद्यालयीन कब्बडी स्पर्धा अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथे
संपन्न झाल्या.
या स्पर्धेतही पाथ्रीकर कॅम्पसच्या संघाने पुन्हा बाजी मारली असून सांघीक
खेळाच्या जोरावर बाजी मारत सर्वप्रथम क्रमांक मिळवला. या संघाला क्रीडा
विभागप्रमुख डॉ. नाजमा खान यांचे मार्गदर्शन लाभले होते. तर या संघात
पठाण सोहेल खान, आशीष विष्णू जाधव,नितीन जाधव,  विनोद चव्हाण,समाधान
थाले, जावेदखान पठाण, आशीष सिध्दार्थ  जाधव,  मदन लाला झा, साईराज
कुंभार,  कुशल अय्यर कीर्तीवासन अय्यर, शंकर भंडारे, सुभाष दलसिंग या
विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Previous articleगायत्री नगरात माता राणीचे उत्साहात आगमन व विधिवत पूजन व स्थापना.
Next articleप्रधान सचिव डवले यांच्या आश्वासनानंतर जि.प. कर्मचार्‍यांचे सामुहीक रजा आंदोलन मागे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.