आशाताई बच्छाव
बांधकाम कामगारांच्या हक्काच्या योजनांसाठी मा.आ. चंद्रकांतजी दानवे साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारी कामगार कार्यालयावर आक्रोश मोर्चा.
प्रतीनिधी जालना – वसंतराव देशमुख दिनांक 23/09/2024.
सविस्तर वृत्त असे की, भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील वंचित बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी व त्यांना बांधकाम साहित्य मिळण्यासाठी आज दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने असंख्य कामगारांना घेऊन सरकारी कामगार कार्यालय जालना येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सत्ताधारी पक्ष मतदारसंघातील बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजनांपासून वंचित ठेवण्यासाठी व मुद्दामहून जनतेला वेठीस धरण्यास प्रशासनावर दबाव आणत आहेत. मागील अनेक वर्षापासून कामगार साहित्य मिळण्यासाठी कामगार त्रस्त आहे.त्यांची या ना त्या कारणाने अडवणूक केली जात आहे. तर बांधकाम साहित्य देखील सत्ताधारी यांच्या मर्जीतील मोजक्याच कामगारांना दिले गेले आहे. त्यामुळे हा केलेला दूजाभाव कशासाठी या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठया संख्येने बांधकाम कामगार मोर्च्यात सहभागी झाले होते.






