Home जालना . खा.राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य;  खा. अनिल बोंडे  व आ. संजय...

. खा.राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य;  खा. अनिल बोंडे  व आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन

86

आशाताई बच्छाव

1000765906.jpg

खा. राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य;  खा. अनिल बोंडे  व आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ- काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे खासदार अनिल बोंडे व आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुरूवारी ( दि19) जालना शहरात काॅंग्रेसतर्फे निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, व शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे शेख मेहमूद, याच्या मार्गदर्शनाखाली..
मस्तगड येथे जिल्हा महिला काॅंग्रेस कमिटी, शहर जिल्हा काॅंग्रेस कमिटी व काॅंग्रेस सेवादलाच्या  वतीने हे आंदोलन करण्यात आले. खासदार राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे खासदार अनिल बोंडे व आमदार संजय गायकवाड  याच्याविरुद्ध शासनाने गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी खासदार बोंडे व आमदार गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जाहीर माफी मागावी , अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी  काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख,महिला काॅंग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, काॅंग्रेस सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष इब्राहीम शेख, प्रदेश महाराष्ट्र सरचिटणीस राम कुर्‍हाडे, शहर जिल्हा सरचिटणीस गणेश चांदोडे, मंथूरा सोळुंके, लतीफा शेख, इंदूबाई मैद, खैरूनिसा सय्यद, कांचन मोरे, फकिरा वाघ, प्रमोद अल्हाट, भागवत घाटे यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleबाप्पांचा विसर्जन सोहळा
Next articleबस-आयशर भीषण अपघातात 6 प्रवाशी ठार;   जखमींना खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली भेट 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.