आशाताई बच्छाव
रोझे गावी ग्रामसेवक चार महिन्यांपासून बेपत्ता!
प्रशासनाचे कानावर हात….
सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप!!
ग्रामसेवक सुवर्णा सांळुखेचा नवा महाप्रताप…..
( राजेंद्र पाटील राऊत)
रोझे/मालेगाव:- नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील रोझे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गत चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याने, गावातील विकासकामे ठप्प झाली आहेत तर या प्रश्नावर प्रशासनाने कानावर हात ठेऊन मुग गिळून गप्प बसल्याची भुमिका घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज (दि.२० सप्टेंबर २०२४) रोजी सरपंच उपसरपंचासह रोझे ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त करण्याबरोबरच प्रशासनाचा निषेध केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,माळमाथ्यावरील रोझे या गावातील ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेविका म्हणून श्रीमती सुवर्णा कडू सांळुखे यांची पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेली असून, नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे या गत चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याने गावातील विकासकामे खोळंबली आहेत.गावात कुठलेही मोठे विकासकामे झालेली नाही.चार महिने बेपत्ता झाल्यानंतर मध्यंतरी ग्रामसेविका रोझे या गावी हजर झाल्या तर पुन्हा गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक ग्रामसेविका बेपत्ता झाल्याने सरपंच उपसरपंचानी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी देऊन ग्रामसेवक बदलून देण्याची मागणी केलेली आहे.तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांनी “मी या प्रकरणी काहीच करु शकत नाही”अशी भुमिका घेतल्याने ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांना नेमका वरदहस्त कुणाचा? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.रोझे गावी आज रोजी आरो प्लँन्ट बंद अवस्थेत पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे.शिवाय अँरो प्लँन्टच्या इमारतीत जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील रफिक शेख नामक व्यावसायिकांने सतरंज्या व चादरी विकण्याचे दुकान बेकायदेशीर थाटल्याने या ग्रामपंचायतीला कुणी वालीच उरले नाही अशी भयावह दुरावस्था ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेंनी करुन ठेवली आहे.दरम्यान रोझे गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ.सुमनताई अभिमन्यू गायकवाड या आदिवासी महिला असल्याने त्यांना अपमानास्पद वागणूक देणे,त्यांचे फोन न उचलणे, कुठल्याही विषयावर विकासकामात त्यांना विश्वासात न घेणे अशा स्वरूपाची कुटील खेळी ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे खेळीत असल्यामुळे लवकरच ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांची सखोल चौकशी करून, नवीन सक्षम कर्तव्यदक्ष ग्रामसेवक बदलून मिळण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा रोझे सरपंच व उपसरपंचानी निवेदनातून दिला आहे. “हाताणे,लेंडाणे,व-हाणे,टोकडे,रोझे व साजवाळ गावात सतत आपल्या अकार्यक्षम कर्तबगारीचे दिवे पाजळणा-या ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेंना प्रशासनातल्या कुठल्या अधिका-यांचा वरदहस्त आहे की, जेणेकरून गेंड्याची कातडी पांघरूण निर्ढावलेल्या ग्रामसेविका विरुद्ध प्रशासन ठोस कारवाई करण्यास धजावत नाही.सुवर्णा सांळुखे प्रकरणाची सखोल चौकशी करून रोझे ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी युवा मराठा महासंघ स्वतः या उपोषण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे”