आशाताई बच्छाव
पती हयात असतांना दाखवले मयत : संबघित तलाठ्यांवर कारवाई करा- वृयोवृध्द
पत्नीचे मुलासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू : उपोषणाचा
आज चौथा दिवस
जालना, दि. १८(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-पती हयात असताना त्यांना मयत्त दाखवून आम्हाला
मिळणारी वयोवृध्दाची पेन्शन न मिळाल्यामुळे माझे पती मयत असल्याची बाब
माहीती झाल्यामुळे पती मयत झाले व त्याबाबत शासनाकडे न्याय मागितला असता
मला वयोवृध्द मागासवर्गीय विधवा महिलेस न्याय न मिळाल्यामुळे व संबधीत
तलाठी यांनी खोटी माहीती दिल्यामुळे त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही न
झाल्यामुळे १६ सप्टेंबर रोजीपासून भोकरदन तालुक्यातील सिरजगाव मंडप येथील
सुभद्राबाई रामराव सिरसाट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या
कुटुंबासोबत आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असून
प्रशासनाचे कोणीही उपोषणस्थळी फिरकले नाही.
सुभद्राबाई रामराव सिरसाट यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे की, भोकरदन तालुक्यातील सिरजगाव मंडप येथील रहिवासी असुन मी व
माझे पती आम्ही दोघेही वयोवृध्द झालेला होतो, माझे पती यांना महाराष्ट्र
शासनाकडुन श्रावण बाळ योजने अंतर्गत पैसे मिळत होते व त्यावर माझे पती
यांचा औषध उपचार खर्च चालत होता. तसेच माझे पती यांची पगार बंद
झाल्यामुळे मी त्याबाबत संपुर्ण चौकशी केली असता तलाठी अरुण संपतराव
गांवडे यांनी माझे पती हयात असताना मयत असे घोषित करुन मिळणारी पगार बंद
केली. या बाबत माझे पती यांना माहीती मिळाली असता त्या धास्तीने ते मयत
झाले असल्याचा आरोपही सुभद्राबाई सिरसाट यांनी निवेदनात केला असून मी
याबाबत वरिष्ठाकडे तक्रार दिली असतांना सुध्दा माझे वयोवृध्द विधवा
महिलेचे काही एक न ऐकुण घेता व मला कुठल्याच प्रकारचा न्याय न देता
आजपर्यत माझी एक प्रकारची हेळसांड करण्यात आलेली आहे.






