Home जालना माहोरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

माहोरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

159

आशाताई बच्छाव

1000751125.jpg

माहोरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप .

तालुका प्रतिनिधी जाफ्राबाद -मुरलीधर डहाके
दिनांक १५/०९/२०२४
तालुक्यातील माहोरा येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले लाभार्थी विलास रामभाऊ लहाने , दत्ता ज्ञानदेव वैद्य , दत्ता बोरसे यांच्या घराचे पूजन सरपंच गजानन पाटील लहाने , प. स . चे इंजिनिअर राठोड , कृ .उ . बा . समितीचे मा . सभापती भाऊसाहेब पाटील जाधव , विलास पाटील लहाने बाळासाहेब गव्हले आदिंच्या हस्ते पुजन करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . माहोरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दुसऱ्या टप्प्यात १०१ घरकुल मंजुर झाले असून पुर्वी लाभ घेतलेल्या चे नावे यादीत चुकुन आल्यामुळे दुसऱ्या लाभधारकांना त्यांचा लाभ दिल्या जाईल असे इंजिनिअर राठोड यांनी सांगितले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल , तसेच घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणीही परस्पर आर्थिक व्यवहार करू नये असे सरपंच गजानन पाटील लहाने यांनी सांगितले,

Previous articleमोकभणगीत रक्तदान शिबीर संपन्न
Next articleलातूर येथे १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.