Home बुलढाणा बुलढाणा ते वरवंडफाट्या पर्यंतचा रस्ता झाला खड्डेमय, रस्त्यासाठी आंदोलन उपोषण केले, मात्र...

बुलढाणा ते वरवंडफाट्या पर्यंतचा रस्ता झाला खड्डेमय, रस्त्यासाठी आंदोलन उपोषण केले, मात्र आंदोलनाला आलं अपयश, खड्डेमय रस्त्यावर ठोस उपाय योजना करण्याची जनतेची मागणी…

98

आशाताई बच्छाव

1000749924.jpg

बुलढाणा ते वरवंडफाट्या पर्यंतचा रस्ता झाला खड्डेमय, रस्त्यासाठी आंदोलन उपोषण केले, मात्र आंदोलनाला आलं अपयश, खड्डेमय रस्त्यावर ठोस उपाय योजना करण्याची जनतेची मागणी…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलढाणा पावसाळा,खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केले आहे.यातून बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही. त्यामुळे त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतचा खड्डेमय डांबरी रस्ता मरणयातना भोगत असून, रस्त्यावरून जाणारे वाहनधारक व नागरिक बेहाल दिसताहेत.परिणामी निर्ढावलेल्या प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध अनेक जण आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
शहरातील त्रिशरण चौकापासून ते वरवंड फाट्यापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते तर खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. रस्ता धोकादायक बनल्याने विद्यार्थी, रुग्णांचे हाल होताहेत.
गेली अनेक वर्षे पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था होते; मात्र प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पुन्हा मात्र परिस्थिती जैसे थे च असते.
केवळ राजकीय मंत्री आले की रस्त्याची थातुरमातुर मलमपट्टी केली जाते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर आले होते तेव्हा रस्त्याचा प्रचंड उल्लेख त्या ठिकाणी झाला होतामात्र सद्यस्थितीत या रस्त्याचे हाल न पाहिलेलेच बरे! या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी तुंबल्याने डासोत्पतीचे स्थान होवून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.त्रिशरण चौक ते वरवंड फाट्यापर्यंत रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.काही राजकारणी लोकांनी या रस्त्यासाठी आंदोलन उपोषण केली होती, मात्र आंदोलनाला यश आले नाही.हे आंदोलन केवळ प्रसिद्ध मिळविण्यासाठी होते का?असाही प्रश्न विचारला जात आहे.
या खड्डेमय रस्त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जनतेकडून होत आहे; मात्र प्रशासनाकडून मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जनता संतप्त झाली असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

Previous articleग्रामसेवक व बिडीओं वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ! -भाऊ भोजने यांची मागणी
Next articleखमारीची प्राची चटप चमकविणार भारताचे नाव भारतीय टीमची कर्णधार म्हणून निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.