Home जालना जानेफळ पंडित गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जानेफळ पंडित गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

234

आशाताई बच्छाव

1000747677.jpg

जानेफळ पंडित गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधी जाफराबाद -मुरलीधर डहाके
दिनांक 14/09/2024
जाफराबाद तालुक्यातील जानेफळ पंडित गावामध्ये रात्रीचे वेळी ड्रोन न कॅमेरा घालत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गावातील तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन कॅमेरा गिरट्या घालत आहे. गावातील वेगवेगळ्या भागात रात्रीचे आठ ते नऊच्या नंतर एक ड्रोन कॅमेरा घिरट्या घालताना दिसतोय. ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी चोर टेहळणी तर करत नाहीत ना ? असा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून पोलीस प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गावात अशाच पद्धतीचे ड्रोन घिरट्या घालत होतं त्यावेळी गावातील तरुणांनी या ड्रोनचा काही वेळ पाठलाग केला नेमके हे ड्रोन कशाचे आहेत परंतु ड्रोन हाती आले नाही ते वारंवार गावात वरती घिरट्या का घालतात यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे. अफवा मोठ्या प्रमाणात होत आहे. गावातील नागरिक रात्र जागून काढत आहेत. गावातील नागरिक यांनी स्थानिक जाफराबाद पोलीस स्टेशनला दूरध्वनी द्वारे कळविण्यात आले आहे.

Previous article१५ वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्ते ‘समृद्धी’ने केले दुरुस्त
Next articleनांदगाव मतदार संघातून राजेंद्र पाटील राऊत राष्ट्रीय मराठा पार्टीकडून इच्छुक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.