Home जालना जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट

जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट

106

आशाताई बच्छाव

1000744262.jpg

 

जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामास

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट

 

जालना, दि. 13 (जिमाका) :-  जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर विकसित करण्यात येत असलेल्या विविध क्रीडा संकुलाच्या कामांना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी अचानक भेट देत पाहणी केली. कामांच्या पाहणी दरम्यान कंत्राटदार, वास्तुविशारद तसेच संबंधित अधिकाऱ्यांना प्रगतीवर असलेली व अंतिम टप्प्यातील कामे दर्जेदारपणे करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्हा क्रीडा संकुलावर टप्पा क्र.1 अंतर्गत टेनिस कोर्ट 2, सिंथेटीक बास्केटबॉल 1, आर्टिफिशियल क्रिकेट टर्फ 1, सिंथेटीक स्केटींग रिंग 1, व्हॉलीबॉल मैदान 2, कबड्डी मैदान 2, खोखो मैदान 2, जिम हॉल 1, संरक्षक भिंत तसेच अंतर्गत रस्ते व ड्रेनेज लाईन आदि कामे जिल्हा क्रीडा संकुल समितीकडून विकसित करण्यात येत आहेत. टप्पा 2 अंतर्गत 400 मिटर सिंथेटीक ट्रॅक व नॅचरल फुटबॉल मैदानाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणीही जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, कंत्राटदार, वास्तुविशारद धीरज शर्मा, क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, क्रीडा मार्गदर्शक सिध्दार्थ कदम, आशिष जोगदंड, संतोष वाबळे यांची उपस्थिती होती.

 

 

Previous articleभाजपा अध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण च्या वतीने निषेध आंदोलन
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांकरिता लाडला पत्रकार योजना सुरू करावी- संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.