Home जालना अजिंठा येथे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था लिंक वर्कर प्रकल्प अंतर्गत आरोग्य शिबीर...

अजिंठा येथे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था लिंक वर्कर प्रकल्प अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न

199

आशाताई बच्छाव

1000738807.jpg

अजिंठा येथे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था लिंक वर्कर प्रकल्प अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 12/09/2024
याविषयी सविस्तर वृत्त असे की,
आज दिनांक.12/9/2024.रोजी अजिंठा येथे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था लिंक वर्कर प्रकल्प अंतर्गत व प्राथमिक आरोग्य केंद्र शिवना व आयसीटीसी सेंटर ग्रामीण रुग्णालय सोयगाव यांच्या संयुक्तयुद्धमाने अजिंठा येथे एच.आय. व्ही.व प्रोढ बीसीजी लसीकरण व आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा लिंक वर्कर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रौढ बीसीजी लसीकरणाचे उद्घाटन डॉक्टर भुषण पारधे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या शिबिरात 86.लोकांची एच. आय. व्ही. व आर .एम. सी. तपासणी करण्यात आली. तसेच या शिबिरात टीबी बीसीजी लसीकरण 93 लोकांचे करण्यात आले.या कॅम्पचे व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन मनसुख भाऊ झांबड अध्यक्ष मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व अप्पासाहेब उगले पाटील लिंक वर्कर प्रकल्प संचालक व अन्नपूर्णा ढोरे मॅडम प्रकल्प समन्वयक (drp ) तसेच साधना गंगावणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी छत्रपती संभाजी नगर व डॉ. नासेर खान पठाण तालुका आरोग्य अधिकारी (tho ) सिल्लोड व डॉ. भुषण पारधे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिवना यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला हा कॅम्प व आरोग्य शिबिर टीबी बीसीजी प्रौढ लसीकरण यशस्वी करण्यासाठी खालील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली यात बीसीजी लसीकरण अनिता राठोड सिस्टर आरोग्य सेविका यांनी लोकांना लस दिली व सुनील शिंदे यांनी लाभार्थ्यांचे नाव नोंदणी केले तर टीबी विषयी माहिती एस. पी. इंगळे सुपरवायझर व एस. के. दौड सिस्टर आरोग्य सेविका यांनी दिली आणि एच आय व्ही एड्स विषयी माहिती अरुण चव्हाण देशमुख लिंक वर्कर व सुनील वानखेडे कौन्सिलर यांनी दिली तर लोकांची एचआयव्ही तपासणी महेंद्र पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी केली तसेच उपस्थित लोकांना लिंक वर्कर प्रकल्प आणि एचआयव्हीचे मुख्य कारणे या विषयी माहिती विशाल पडवळ सुपरवायझर यांनी दिली तसेच या कॅम्प आरोग्य शिबीर व टीबी प्रौढ बीसीजी लसीकरनात डॉक्टर भुषण पारधे यांनी लोकांची बीपी शुगर आणि आर एम सी तपासणी केली व टीबी लस टीबी विषयी व टीबी संसर्ग कसा होतो याविषयी सविस्तर माहिती दिली व लोकांना त्यांच्या आरोग्य विषयी सविस्तर माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर दिनाजी खंदारे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अजिंठा /सोयगाव नितीन गजबे सिकलसेल कॉन्सिलर ग्रामीण रुग्णालय अजिंठा आशा वर्कर प्रमिला झलवार संध्या बिरारे अरेफा सैयद जयश्री शिंदे गीतांजली वैद्य दुर्गा पुरे पौर्णिमा बिरारे सुरेखा माहोर तायरा पठाण आशा सुपरवायझर शारदा आपार ,शेख वाजीद वाहन चालक यांनी मेहनत घेतली.

Previous articleवालसावंगीत अचानक लागलेल्या आगीत तीन दुकानाचे नुकसान
Next articleहेल्थ एटीएम मशीन मानद नामांकन विनाच! तालुक्यातील ६ आरोग्य केंद्रात हेल्थ एटीएम ३ आरोग्य केंद्र एटीएम विना!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.