Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन कार्यकारिणी साठी शनिवारी...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन कार्यकारिणी साठी शनिवारी बैठकीचे आयोजन.

36
0

आशाताई बच्छाव

1000735847.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन कार्यकारिणी साठी शनिवारी बैठकीचे आयोजन.

तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड मुखेड -पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना सत्य बातम्या लिहिण्यात आल्यामुळे व अन्यायाविरुद्ध वास्तव लिखाण केल्यामुळे अनेकदा पत्रकार (वार्ताहर) यांच्यावर खोटे गुन्हे व त्यांना नाहक त्रास देत धमकवण्यात येते. असे अनेकदा देशभरासह राज्यातही पहावयास मिळाले.अनेकवेळा जाणीवपूर्वक पत्रकारांवर हल्ले करण्यात येतात अशावेळी पत्रकारांना न्याय मिळवुन देण्यासाठी संघटनेची महत्वपूर्ण भूमिका ठरते. त्यामुळे भारत सरकार मान्यता प्राप्त असलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नावाची राज्यभरातील नावाजलेल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.अंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संघटनेची मुखेड तालुक्यात सन २०१८ मध्ये पत्रकार संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष निर्भीड पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या माध्यमातून स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या सन २०२३ -२४ मधील कार्यकरिणीची मुदत संपली असल्याने सन २०२४-२५ या नूतन कार्यकारिणी साठी मुखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे दि.१४ सप्टेंबर रोज शनिवारी दुपारी १२:३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसार माध्यमांना सांगत,मुखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन ही पत्रकार भारत सोनकांबळे यांनी केले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे सर यांच्या आदेशानुसार, मुखेड तालुका नूतन कार्यकारणी ची घोषणा या बैठकीदरम्यान करण्यात येणार आहे. या बैठकीला नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष पांडुरंग कोटूरवार,जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे,जिल्हाकार्याध्यक्ष भारत सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here