Home बीड जोडरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

जोडरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

99

आशाताई बच्छाव

1000733516.jpg

जोडरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
दिड तास महामार्गावरील वाहतूक खोळंबली 

 प्रतिनिधी/आष्टी :- शेगाव – पंढरपूर महामार्गावरील भगवान बाबा नगर, दत्त नगर, पळशी व आनंदगाव सह शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सना – सुगीच्या काळात झालेल्या या आंदोलनामुळे दिड तास महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.म रा रस्ते विकास महामंडळाकडून एका महिन्याच्या मुदतीत करुन घेण्याची जबाबदारी आष्टी ठाण्याचे सपोनी सचिन इंगेवाड यांनी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आले.
आष्टी पासून माजलगाव कडे जाणाऱ्या
शेगाव – पंढरपूर महामार्गाला भगवान बाबा नगर, दत्त नगर, पळशी व आनंदगाव येणाऱ्या
रस्त्यालां जोडला (जांगाशन) नसल्याने या गावांच्या शेतकऱ्यांना उलट्या दिशेने जावें लागते या प्रकारामुळे अनेक अपघात झाले आहेत. पुढील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गाच्या मधोमध असलेले डिव्हायडर तोडून त्या ठिकाणी
जगशेन करणे आवश्यक आहे. या बाबत प्रशासनातील जिल्हा अधिकारी व संबंधित दिंडी महामार्गाचे अधिकाऱ्यांना दिनांक ७  जुलै २०२४ रोजी कळविले होते. परंतू प्रशासन व जालना रस्ते विकास महामंडळाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने वरिल गावकऱ्यांच्या वतीने  दिनांक ०९ ऑगस्ट २०२४  रोजी सकाळी ११:३०  वाजेपासून १:०० पर्यंत दिड तास रास्ता रोको जगसेन (रास्ता जोडो) आंदोलन करण्यात आले.दरम्यान म रा रस्ते विकास महामंडळाकडून एका महिन्याच्या मुदतीत वरिल काम पुर्ण करुन देण्याचे आश्वासन आष्टी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांना फोनद्वारे दिले. हे काम कार्यकारी अभियंता यांच्याकडून करुन देण्याच्या  जबाबदारी आष्टी ठाण्याचे सपोनी सचिन इंगेवाड यांनी शेतकरी आंदोलकांना दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन एका महिन

Previous articleडॉक्टरच्या घरात धाडसी चोरी..! -दागिन्यांसह 75 हजारांचा मुद्देमाल लंपास ! – पोलिसांना चोरट्याची आव्हान!
Next article..तर याच शैक्षणिक वर्षापासून मेडिकल कॉलेज सुरू होईल – आ.कैलास गोरंटयाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.