Home जालना सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी उज्वल देशमुख मैदानी स्पर्धेत जिल्ह्यातुन...

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी उज्वल देशमुख मैदानी स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम आणि राज्यस्तरावर निवड.

140

आशाताई बच्छाव

1000729430.jpg

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी उज्वल देशमुख मैदानी स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम आणि राज्यस्तरावर निवड.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 08/09/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 18/ 8/ 2024 रोजी जालना जिल्हा हौशी ॲथलेटिक असोसिएशन तर्फे जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी येथे 19 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान शिवछत्रपती क्रीडा पीठ मलंगे बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणीतून सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा खेळाडू विद्यार्थी उज्वल वसंतराव देशमुख याने गोळा फेक या मैदानी स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकावला असुन दिनांक 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान शिवछत्रपती क्रीडा पीठ म्हलुंगे बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणीतून त्याची निवड झाली आहे.या स्पर्धेसाठी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक मा.के.व्ही.नवल सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच क्रीडा प्रबोधिनीचे संचालक तथा जिल्हा मैदानी असोसिएशनचे जिल्हा सचिव माननीय प्रमोद खरात सर(P.J.Kharat) यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.क्रीडा शिक्षक श्री के.व्ही.नवल सर व क्रीडा प्रबोधिनीचे संचालक तथा जिल्हा मैदानी असोसिएशनचे जिल्हा सचिव प्रमोद खरात सर यांच्या मार्गदर्शनामुळेच माझी राज्यस्तरावर निवड झाली असल्याची प्रतिक्रिया विजयी खेळाडू विद्यार्थी उज्वल देशमुख याने दिली आहे.

Previous articleमुंबई समाचार २०० नॉट आऊट’ डॉक्युमेंटरीचे लोकार्पण
Next articleनांदेड जिल्ह्यातील संकटातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार – ना. अनिल पाटील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.