Home बुलढाणा अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली ; छ. संभाजीनगर येथील एम.जी.एम रुग्णालयात...

अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली ; छ. संभाजीनगर येथील एम.जी.एम रुग्णालयात उपचार सुरू…

113

आशाताई बच्छाव

1000729324.jpg

अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली ; छ. संभाजीनगर येथील एम.जी.एम रुग्णालयात उपचार सुरू…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा तब्बल चार दिवस अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. दरम्यान काल ०७ सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्या बैठकीच्या निमंत्रणावरुन त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. सिंदखेडराजा येथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजात 4 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले हॊते. सलग चार दिवस रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती चांगलीच बिघडली होती. दरम्यान राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी रविकांत तुपकर मागण्यासंदर्भात ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक लावली आहे. ना.पवार व संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रविकांत तुपकरांना दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीसाठी मध्यस्थी केली. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तुपकरांना चर्चेसाठी बोलाविले आहे, त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती शेतकरी व सहकाऱ्यांनी केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थळी उपस्थित महिलांच्या हस्ते व माँसाहेब जिजाऊ चरणी नतमस्तक होत आपले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले. तुपकर ची प्रकृती खालावल्याने उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचाराचा दाखल होण्याचे सांगितले. त्यामुळे सहकाऱ्यांनी रविकांत तुपकर यांना उपचारासाठी घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रविकांत तुपकरांची शुगर लेवल अत्यंत कमी झाली असून थ्रोट इन्फेक्शन व किडण्यांवरही परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी तुपकर यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगितले. दरम्यान माझ्या प्रकृतीची चिंता करू नका शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन लवकरच बाहेर पडणार आहे. माझ्या भेटीसाठी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरला येऊ नये, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

Previous articleमहाराष्ट्र पत्रकार संघातर्फे वृक्षारोपण
Next articleश्रीरामपूर शहरातील रस्त्यांसाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार लहू कानडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.