Home बुलढाणा थरारक घटना! शेगाव रेल्वे स्थानकात महिलेची रेल्वे समोर उडी!

थरारक घटना! शेगाव रेल्वे स्थानकात महिलेची रेल्वे समोर उडी!

131

आशाताई बच्छाव

1000722890.jpg

थरारक घटना! शेगाव रेल्वे स्थानकात महिलेची रेल्वे समोर उडी!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकात एका महिलेने भरधाव रेल्वे गाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
उघडकीस आली आहे. अटाळी येथील सौ अर्चना अनंता महाले असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
या महिलेने 11 वाजता समोरून येणाऱ्या भरधाव रेल्वे गाडी समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेचा अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. घटनेतील या विवाहितेचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे कौटुंबिक ताण- तणावामुळे तिने आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. घटनेचा व्हिडिओ मानवी मन सुन्न करणारा ठरत आहे.