Home नांदेड खरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन.

खरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन.

35
0

आशाताई बच्छाव

1000687310.jpg

खरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 27 ऑगस्ट :- शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणी कालावधी 15 सप्टेंबर 2024 पर्यत आहे. नांदेड तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनाचा लाभ सुलभतेने मिळावा. पिक कर्ज, पिक विमा, नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी यासाठी ई-पिक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे ई-पिक पेऱ्याची नोंद 15 सप्टेंबरपूर्वी करावी असे आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2024 साठी क्षेत्रीय क्षेत्रीय स्तरावरुन पिक पाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डाटा/माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पिक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांना सक्रिय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे, पिक विमा पिक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, आपत्ती मुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट फोन मोबाईल मध्ये प्लेस्टोअर मधून ई-पिक पाहणी ॲप इंन्स्टॉल करुन , सुरु करुन त्यात पिक पाहणी/पेऱ्याची नोंद नोदवावी. काही अडचणी निर्माण झाल्यास आपल्या गावचे मंडळ अधिकारी, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतशिल शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र साक्षर स्वयंसेवक यांनी ई-पिक पेरा पूर्ण करुन घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

शेतकरी ॲपद्वारे पिक पेरा नोंदविण्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्तधान्य दुकानदार, कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतशिल शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र स्वाक्षर स्वयंसेवकांनी ई-पिक पेरा नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही तहसिलदार नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleखा.वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Next articleसन्मित्र ट्रक वाहतूक संघ (मुरुड- अलिबाग) अध्यक्षपदी प्रशांत नाईक यांची बिनविरोध फेरनिवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here