Home जालना कसे सत्य सांगू, की मला माणसाची भीती वाटते रे..’ ‘श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…अंजनी...

कसे सत्य सांगू, की मला माणसाची भीती वाटते रे..’ ‘श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…अंजनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कवि संमेलन रंगले

19
0

आशाताई बच्छाव

1000683483.jpg

‘कसे सत्य सांगू, की मला माणसाची भीती वाटते रे..’

‘श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…अंजनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कवि संमेलन रंगले

जालना / दिलीप बोंडे ब्युरो चीफ: अंजनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांच्या मातोश्री स्व. अंजानी किरवले यांच्या 21 व्या स्मृतिदिनानिमित्त  आयोजित ‘श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…’  हे निमंत्रितांचे कवि संमेलन बहारदार कवितांनी रंगले. एकापेक्षा एक सरस आणि तितक्याच आशयघन कवितांची बरसात झाल्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.
जालना शहरातील ब्राह्मण सभा भवनात गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी ‘श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…’ हे निमंत्रितांचे बहारदार कविसंमेलन पार पडले. या संमेलनाचे उदघाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश श्रीमती भालसाकडे वाघ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक बालाजी बालाजी किरवले होते. यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ ब्रह्मानंद चव्हाण, जीवरेखा नदी समन्वय एम.डी.सरोदे, ओम हॉस्पिटलचे अर्जुन वाहुळे यांची प्रमुख  पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव भालसाकडे वाघ मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांचे हक्क कायदे व अधिकार या विषयी थोडक्यात माहिती दिली..
यावेळी कवि डॉ. सुहास सदावर्ते यांच्या
‘कसे सत्य सांगू, कसे काय भांडू,
की मला माणसाची भीती वाटते रे..’
या आणि कवि कैलास भाले यांनी सादर केलेल्या
‘पाऊस अवकाळी, विझवतो चूल
गळक्या घराला,अफूची भूल…’
या लघु कवितांना रसिकांना अंतर्मुख केले. डॉ. दिगंबर दाते यांनी  सादर केलेली
‘आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत…
असताना कुठे कळतो तो, नसताना बसतो झुरत…’ या कवितेने रसिकांची दाद मिळविली.

Previous articleगज केसरी कंपनी स्फोट प्रकरणी कारवाई होईलच मात्र कामगारांचा जीव महत्त्वाचा – खा. डॉ. कल्याण काळे
Next articleमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासन लागले कामाला, सायन-पनवेल महामार्ग चकाचक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here