Home जालना गज केसरी कंपनी स्फोट प्रकरणी कारवाई होईलच मात्र कामगारांचा जीव महत्त्वाचा –...

गज केसरी कंपनी स्फोट प्रकरणी कारवाई होईलच मात्र कामगारांचा जीव महत्त्वाचा – खा. डॉ. कल्याण काळे

21
0

आशाताई बच्छाव

1000683474.jpg

गज केसरी कंपनी स्फोट प्रकरणी कारवाई होईलच
मात्र कामगारांचा जीव महत्त्वाचा – खा. डॉ. कल्याण काळे
जखमी कामगारांची केली आस्थेवाईकपणे विचारपूस
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)- जालना शहरातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील गज केसरी स्टील कंपनीत झालेला स्फोट हा भयंकर असून यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत, या घटनेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेवून कामगारांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केले आहे.
गज केसरी स्टील कंपनीत झालेल्या दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गज केसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात 34 कामगार जखमी झाले असून 7 कामगार हे गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त कंपनीला भेट दिल्यानंतर तेथे कामगारांसाठी सुरक्षा असलेले साहित्य, अग्निरोधक वस्त्रे आढळून आलेली नाहीत, भट्टीची नियमितपणे देखभाल व दुरूस्ती न केल्याने भट्टीचा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. कंपनी व्यवस्थापन व औद्योगिक सुरक्षा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे खासदार डॉ. काळे यांनी सांगितले.
स्फोट झालेल्या कंपनीची पाहणी केल्यानंतर डॉ. काळे यांनी स्फोटात जखमी झालेल्या कामगारांवर औषधोपचार सुरू असलेल्या एका खासगी रुग्णालयात जावून जखमी कामगारांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या जखमी कामगारांवर योग्य ते औषधोपचार करण्याची विनंती संबंधितांना केली. दरम्यान, खासदार डॉ. कल्याण काळे यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक धीरज खिरडकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याशी संपर्क साधून या स्फोट प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here