Home जालना चतुर्थ सोमवार निमित्त संगमेश्वर महादेव दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

चतुर्थ सोमवार निमित्त संगमेश्वर महादेव दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

100

आशाताई बच्छाव

1000682410.jpg

चतुर्थ सोमवार निमित्त संगमेश्वर महादेव दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 06/08/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील घानखेडा ( संगमेश्वर )येथे चतुर्थ सोमवार श्रावण सोमवार निमित्त संगमेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील भाविक सकाळ पासून दर्शनाला येतात. माहोरा येथून संगमेश्वर महादेव मंदीर पाच किलोमिटर अंतरावर आहे. भाविक टुव्हीलर, रिक्षा, व काही जन पायीच दर्शन घेण्यासाठी येतात. नवसाला पावणारा महादेव अशी ख्याती आहे असे भाविक सांगतात. जुई नदी आणि केळना नदी या दोन्ही नद्यांच्या संगमावर असल्याने संगमेश्वर महादेव असे नाव पडले आहे. पूर्वी पासूनच मेळातील महादेव अशी या महादेवाची महती आहे.

Previous articleतेली समाजाने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी राहावे.
Next articleशिर्डी येथे मोफत कुत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.