Home जालना आई-वडिलांनी काबाडकष्ट करीत पोटाला चिमटा घेऊन शिक्षण दिलं याची जाण ठेवून समाजाची...

आई-वडिलांनी काबाडकष्ट करीत पोटाला चिमटा घेऊन शिक्षण दिलं याची जाण ठेवून समाजाची सेवा करा

107

आशाताई बच्छाव

1000668934.jpg

आई-वडिलांनी काबाडकष्ट करीत पोटाला चिमटा घेऊन
शिक्षण दिलं याची जाण ठेवून समाजाची सेवा करा
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
जालना, दि. २२(प्रतिनिधी दिलीप बोंडे)– तुमच्या आई-वडिलांनी काबाडकष्ट केले. आपल्या
पोटाला चिमटा घेऊन विपरीत परिस्थितीत शिक्षण दिले. तुम्ही त्याचे चीज
केले पण तुमच्या निवडीचा कुटुंब व समाजाला आनंद झाला याची कायम जाणिव
ठेवा. शासकीय नोकरीच्या माध्यमातून समाजाची सेवा करा. वंचितांना
गरजवंतांना न्याय देण्याची भूमिका घ्या, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले.
जालना तालुक्यातील पिरकल्याण जवळील आनंदवाडी या दोनशे ते अडीचशे
लोकसंख्या असलेल्या गावातील १४ युवकांची शासनाच्या विविध खात्यात निवड
झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत
होते. आनंदवाडी हे जालना तालुक्यातील छोटेसे गाव. गावात जाण्यास नीट
रस्ताही नाही. कमी लोकसंख्या असल्यामुळे गावाकडे प्रशासनाचे कायम
दुर्लक्ष. अशा या विपरीत परिस्थितीत गावातील १४ तरुणांनी पोलीस दलासह
विविध शासकीय खात्यात नोकरीसाठी प्रयत्न केले, त्यात त्यांना यश मिळाले.
गावकरी व परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड आनंद झाला. करिता त्यांच्या
सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे
माजी अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरीहर शिंदे,
प्रभाकर उगले, सरपंच सुरेश वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर पुढे म्हणाले की,
आपण ज्या समाजातून आलो त्या समाजावर आपण मिळालेल्या अधिकाराच्या
माध्यमातून अन्याय करतो ही दुर्दैवी बाब आहे.सरकार आपल्याला पगार देते.
परंतु शेतीच्या फेरासाठी जेव्हा त्याची अडवणूक केली जाते.

Previous articleकाँगेस पदाधिकारी सय्यद जावेद अली यांचा टिळक भवन येथे सत्कार
Next articleबदलापूर प्रकरणी काँग्रेस पक्ष आक्रमक : फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.