Home जालना जालना येथील घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद करून 03 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण...

जालना येथील घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद करून 03 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत.

77

आशाताई बच्छाव

1000664464.jpg

जालना येथील घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद करून 03 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत.
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक -21/08/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना शहरात दिनांक 8/ 6 /2024 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास आंबड चौफुली भागातील योगेश नगर येथे एका बंद घराचे लॉक तोडून अज्ञात आरोपींनी कपाटातील सोन्या चांदीचे व रोख रक्कम चोरी केली होती. त्याप्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरंन 373 /2024 कलम 457, 380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्यातील आरोपी शोध घेणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 20/08/ 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्यातील आरोपी गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक या गुन्हेगाराचा शोध घेत असतांना तो गांधीनगर येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरी केलेले 03 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण काढून दिले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सपोनी. श्री योगेश उबाळे, सपोनी श्री शांतीलाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ, सोबत पोलीस अमलदार शाम्युअल कांबळे ,कृष्णा तंगे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे, संदीप चिंचोले, धीरज भोसले, योगेश सहानी, कैलास चेके, सौरभ मुळे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.

Previous articleसामाजिक माध्यमांचा चक्रव्यूह – न्यायाचार्य शास्त्री भगवान बाबा.
Next articleमाहोरा ग्रामसंसद च्या उपसरपंच पदी बाबासाहेब बोरसे यांची बिनविरोध निवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.