Home उतर महाराष्ट्र धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका रंगेहाथ अटक

धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका रंगेहाथ अटक

93
0

आशाताई बच्छाव

1000662884.jpg

धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका रंगेहाथ अटक

धुळे (प्रतिनिधी) : उमेश पाटील
येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (अतिरिक्त कार्यभार) अधीक्षक मिनाक्षी भाऊराव गिरी यांना २ लाखाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आज सायंकाळी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दाम्पत्याला एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील मंजूर थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. अधिक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत सुरू होते.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली.

Previous articleरायगडच्या धैर्यशील पाटील यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर
Next articleसामाजिक माध्यमांचा चक्रव्यूह – न्यायाचार्य शास्त्री भगवान बाबा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here