Home पुणे गुरुजन वंदन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

गुरुजन वंदन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

197

आशाताई बच्छाव

1000661755.jpg

गुरुजन वंदन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
नवी सांगवी : सुवर्ण पुष्प संस्था (महाराष्ट्र राज्य), पांचाळ सोनार समाज यांच्या संयुक्त विद्यमातून
गुरुजन वंदन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. सदर सोहळा पंडित भीमसेन जोशी कला मंदिर, औंध पुणे येथे रविवारी (दि. १८) सकाळी दहा ते दोन या वेळेत पार पडला. सोहळा प्रसंगी महाराष्ट्रातून अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सोहळ्या दरम्यान मंगळवेढा येथील यशस्वी उद्योजक व सराफ जयदीपदादा रत्नपारखी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरुजनांचा देखील शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
सोहळ्यात सुरवातीला समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शैक्षणिक वस्तू तसेच आर्थिक मदत करण्यात आली. सोहळ्यात विद्यार्थी व गुरुजनवर्ग यांना मानाचे फेटे बांधण्यात आले होते. सोहळ्याचे औचित्य साधत पांचाळ सोनार समाज वधु वर परिचय देखील घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शैक्षणिक दृष्ट्या योग्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील पंडित, श्रीहरी वेदपाठक, सुलभाताई वेदपाठक, वैशालीताई वेदपाठक यांनी केले.
सोहळ्यात संतोष सोनार (शेळगाव), सचिन बनकर (अकलूज), जयदीप रत्नपारखी (मंगळवेढा), मनोज पंडित (धाराशिव), ज्येष्ठ चित्रकार दिलीप घोडके (कल्याण), दिपश्री घोडके (पनवेल), सीमा दीक्षित (मोरगाव), सुवर्ण पुष्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश महामुनी, अध्यक्ष शोभाताई महामुनी, अध्यक्ष संजय घोडके, माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत दीक्षित, सुभाष दीक्षित, ॲड. शिल्पाताई महामुनी, अन्न व प्रसाधन उपायुक्त अनिल गवते, नोंदणी शुल्क जिल्हाधिकारी अनिल पारखे, उपाध्यक्ष ह.भ.प. उज्वलाताई वेदपाठक, उपाध्यक्ष विनिताताई धर्माधिकारी, आदरणीय माईसाहेब महामुनी, कार्यकारिणी सदस्य ज्योतीताई वेदपाठक, संदीप वेदपाठक, सहसचिव किरण वेदपाठक, उद्योजक रवी महामुनी, युवाध्यक्ष जयेश पोतदार, उद्योजक चक्रधर दीक्षित, खजिनदार शिवानी दीक्षित, सचीव पद्माकर धर्माधिकारी आदी पदाधिकारी, समाज बांधव सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही सांगवीकर महिला अध्यक्ष दिपाली दीक्षित यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जे देऊन परत घेता येत नाही ते शिक्षण होय.. किती अर्थपूर्ण व विचाराधीन ठेवण्यास बाध्य करतात या शब्द धारा. ना कोणती अपेक्षा, ना कोणताही स्वार्थ. विद्येचे उपासक, त्यामागील निस्वार्थ हेतू, हे सर्व जर कोठे दिसतील, ती एकमेव आदर्श व्यक्ती होय. अर्थात गुरुजन किंवा ज्ञानार्जन करणारे आदर्श पुरुष म्हणजेच शिक्षक होय. भावी काळातील माणूस घडविण्याचे एक आदर्श पिढी निर्माण करण्याची महत्वाकांक्षा मनात ठेवून सदैव आपल्या ध्येयापर्यंत पोहचविणारे व साध्य करण्यासाठी धरपडणारे शिक्षक होय. उज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यास त्यांचे विचार व केलेले संस्कार मार्गदर्शक ठरू शकतात.
शोभाताई जगदीश महामुनी, संस्थापक, सुवर्णपुष्प संस्था

Previous articleस्व. राजीव गांधी प्रतिष्टान घ्या वतीने ह.भ.प.ढवळे महाजाना पुरस्कार
Next articleसुभाष त्रिभुवन साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.