Home जालना श्री छत्रपती शिवाजी आश्रम शाळेत स्वतंत्र दीन उत्साहात साजरा

श्री छत्रपती शिवाजी आश्रम शाळेत स्वतंत्र दीन उत्साहात साजरा

335

आशाताई बच्छाव

1000652571.jpg

श्री छत्रपती शिवाजी आश्रम शाळेत स्वतंत्र दीन उत्साहात साजरा… तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 18/08/2024.
15ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी प्रा. व. मा. आश्रम शाळा, माहोरा येथे स्वातंत्रता दिन मोठ्या उत्साहात आणि जाल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गावात वाजत गाजत लेझीम ढोल ताशा च्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. 8:15 वाजता मुख्यध्यापक श्री संदीप सिनगारे सर यांनी ध्वज फडकावला. या वेळी स्काउट आणि गाइड यांनी ध्वजास मानवंदना दिली. विद्यार्थी शिक्षक यांनी आपल्या भाषणा तून स्वातंत्रता संग्रमावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गंगाराम बोरसे तसेच पालक मंडळी उपस्थित होते. या वेळी मुलांना मिठाई वाटप करण्यात आली.
श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा. आश्रम शाळा, माहोरा येथील इ.६वी ची विद्यार्थिनी कुमारी चैताली बालाजी शेळके हिची विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी, नांदेड येथे निवड झाली आहे. या प्रसंगी शाळेच्या वतीने मुख्यध्यापक श्री सिनगारे सर यांनी विद्यार्थिनी चा पालकांसह शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा देशाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे (दादा) भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे युवा तरुण तडफदार आमदार श्री संतोष पाटील दानवे( भाऊ ) तसेच संस्थेचें प्रशासकिय प्रमुख श्री संदीप साबळे सर यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleपांढरुणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
Next articleपानकनेरगाव येथील आकाश देशमुख यांना आरोपी व पी.एस.आय. संभाजी खांडे यांनी केले आत्महत्तेस प्रवृत्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.