Home उतर महाराष्ट्र दिव्यांगांना लायसन्स साठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल-परिवहन अधिकारी अनंता जोशी

दिव्यांगांना लायसन्स साठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल-परिवहन अधिकारी अनंता जोशी

101

आशाताई बच्छाव

1000651582.jpg

दिव्यांगांना लायसन्स साठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल-परिवहन अधिकारी अनंता जोशी
श्रीरामपूर,( दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- प्रत्येकाला जीवनात काहीतरी मिळवायच असतं.त्यासाठी आपण नेहमी संघर्ष करत असतो.परंतु यू.पी.एस.सी.मध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून पद मिळवायची सध्या स्पर्धा आहे. आज-काल माणूस माणुसकी विसरत चालला की काय? एक प्रकारे आंपणच आता दिव्यांग झालो कि काय अशी शंका येते. दिव्यांग मुलांसाठी ही शाळा अत्यंत मोलाचे आणि मूलभूत काम करत आहे. श्रीमपूरकरांसाठी हि अभिमानाची बाब आहे.
18 वर्षे पूर्ण असणाऱ्या दिव्यांगांना कायद्याच्या कक्षेत राहून सर्वांना वाहन परवाना आपल्या सहकार्याने देण्यात येईल.दिव्यांगा प्रति शासनाने मैत्रीपूर्ण धोरण निर्माण केलेले आहे.त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही.मी स्वतःसर्वांना लायसन्स देण्यसाठी विशेष सहकार्य करेल.असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर अजित घोगरे हे होते कार्यक्रमासाठी हा रोटर एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन सुरेश पाटील बनकर सचिव नारायण भाई पटेल विश्वस्त विनोद पाटणे, रोटरी क्लब सदस्य उद्धव तांबोळी मनसुखलाल चोरडिया सहाय्यक परिवहन अधिकारी पवार उल्हास धुमाळ डॉक्टर प्रशांत कदम डॉक्टर रवींद्र भिडे डॉक्टर मयूर कापसे आणि योग गुरु अनिल कुलकर्णी सर यांचे प्रमुख उपस्थिती होती
सुरुवातीला विद्यालयातील विविध सांस्कृतिक,क्रीडा, कलात्मक,सामाजिक व आर्थिक पुनर्वसन उपक्रम संदर्भात, दिव्यांगांच्या विविध समस्या व दिव्यांगत्व येण्यामागील कारणे,दिव्यांगांना वाहन परवाना मिळवण्यासाठी येणाऱ्या समस्या यासंदर्भात सविस्तर विवेचन वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांनी केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दंतरोग तपासणी शिबीर घेतले जाईल.असे आश्वासन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ.अजित घोगरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचा उपचार तज्ञ मंगेश सालपे यांनी केले. सुत्रसंचालन संजय साळवे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संतोष जोशी यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर कवायत प्रकार सादर केले संचलन अतुल साळूंके सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.