आशाताई बच्छाव
(भिला आहेर तालुका प्रतिनिधी)
देवळा:- मेशी ता.देवळा येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. परिसरात घबराट .
मेशी येथे कमळाबाई सुपडू शिरसाठ (वय-६१) या महिलेचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू.याबाबत सविस्तर वृत्त असे की मेशी शिवारात सुपडू गणपत शिरसाठ हे आपल्या पत्नीसह शेतात राहत होते मात्र शनिवारी दुपारी तीन वाजता सुपडू शिरसाठ हे आपल्या मुलीकडे दहिवड येथे गेले व रात्री ते तेथेच मुक्कामी राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते मेशी येथे आपल्या घरी आले असता त्यांनी बाहेरून पत्नीला आवाज दिला मात्र घरातून प्रतिसाद न आल्याने ते घरात गेले असता पत्नी कमळाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या ते भयभीत झाले व आरडाओरडा करत त्यांनी शेजाऱ्यांना बोलविले मात्र नेमकं काय झालं आणि कशामुळे झालं हे त्यांना समजत नव्हते शेजाऱ्यांनी बघितले तर कमळाबाईच्या मानेवर,छातीवर नखं लागले असल्याचे लक्षात आल्यावर काही तरी हिंस्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजले तर काही नागरिकांच्या मते हा बिबट्याचाच हल्ला असल्याचे सांगण्यात आले कारण या परिसरात बिबट्याचा याआधीही वावर असल्याचे बोलले जात होते त्यानंतर लगेचच मेशी येथील वनरक्षक भुपेंद्र राठोड यांना कळविले असता राठोड यांसह वनक्षेत्र अधिकारी कौतिक ढुमसे, वनपाल प्रसाद पाटील ,वनरक्षक विजय पगार,ज्योती सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी देखील सर्व प्रकार समजून घेत कुठल्यातरी हिंस्र प्राण्याचा हल्ला असल्याचं मान्य केलं.काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्याचाच हल्ला असल्याचे बोलले जात होते मात्र वनविभागाच्या टीमने आजूबाजूला बिबट्याच्या पायाचे ठसे आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते मिळून आले नाहीत.कारण तेथील जागा मुरमाड असल्याने ते ठसे मिळून आले नाहीत . त्यानंतर देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील,पोलीस हवालदार चौधरी, गवळी हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी देखील घटनेचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येऊन सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर असून वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली असता वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ त्याठिकाणी पिंजरा व ट्रॅप कॅमेरा लावला आहे.






