Home वाशिम सेट पात्रता परिक्षेत प्रतिक वानखेडे यांचे घवघवीत यश

सेट पात्रता परिक्षेत प्रतिक वानखेडे यांचे घवघवीत यश

90

आशाताई बच्छाव

1000651224.jpg

सेट पात्रता परिक्षेत प्रतिक वानखेडे यांचे घवघवीत यश
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र असलेली सेट म्हणजेच राज्यस्तरीय पात्रता परिक्षा येथील नालंदानगरातील रहिवासी प्रा. अ‍ॅड. मुकुंद वानखेडे यांचे सुपुत्र प्रतिक वानखेडे यांनी पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण करुन घवघवीत यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठव्दारे घेण्यात आलेल्या ३९ व्या सेट या पात्रता परिक्षेचा निकाल लागला असून प्रतिक वानखेडे हा पात्र ठरला आहे. सेट ही परिक्षा सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अत्यंत कठीण समजली जात आहे. ही परिक्षा ७ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. प्रतिक वानखेडे यांनी त्यांचे एमएसस्सी झुऑलॉजीचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्या प्रयत्नातच सेट परिक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशामुळे प्रतिकवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Previous articleसमय की पुकार’ उलझनो से उजालो की और… प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने पाच दिवशीय शिबिराचे आयोजन
Next articleडॉ. तुषार गायकवाड यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.