Home नाशिक देवळा येथील किशोर सागर धरणातून पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा

देवळा येथील किशोर सागर धरणातून पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा

116

आशाताई बच्छाव

1000620676.jpg

देवळा प्रतिनिधी भिला आहेर:– महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत रामेश्वर येथील किशोर सागर धरणातून देवळा शहरासाठी सुरू असलेले ९ कोटी ७२ लक्ष रूपये किंमतीच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचे काम चार वर्षांपासून रखडलेले काम योजनेवरील स्थगिती दूर झाल्यामुळे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
देवळा शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या पहाता सद्याची पाणीपुरवठा योजना अपुरी पडत आहे. गिरणा नदीला सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावर हि योजना अवलंबून आहे. आवर्तन बंद झाले कि योजना ठप्प होते व शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
गिरणा नदीला आवर्तन सोडलेले नसेल त्या वेळी ह्या नवीन पाणीपुरवठा योजनेमार्फत किशोर सागर धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येऊन शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हि योजना पुरक आहे.
उदयकुमार आहेर यांनी नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये सविस्तर पत्र लिहीत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत देवळा नगरपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस तात्काळ स्थगिती देऊन सदर काम रद्द करण्याची मागणी केली होती. यामुळे योजनेच्या कामास स्थगिती मिळून काम रखडले होते. चौकशीअंती कामावरील स्थगिती उठविण्यात आली परंतु यात मोठा कालावधि गेल्यामुळे कामाची किंमत वाढून ह्या कामाचा नविन प्रस्ताव तयार करावा लागणार आहे.

____ देवळा तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठीे चणकापूर ते रामेश्वरपर्यंत असलेल्या चणकापूर उजवा कालव्याची( ० ते 3८ कि मी ) निर्मिती करण्यात आली. कालव्याला सोडण्यात येणाऱ्या पूर पाण्यामुळे किशोर सागर धरणात वर्षभर पाण्याचा साठा असतो. देवळा शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत सुरू असलेली हि नवीन पाणीपुरवठा योजना हि किशोर सागर धरणावर अवलंबून आहे. याकरता किशोर सागर धरणासाठी पाणी आरक्षित करण्यात आले असून चणकापूर उजव्या कालव्याला यापुढे दरवर्षी तीन आवर्तन नियमितपणे मिळणार आहेत. यामुळे देवळा शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागून किशोर सागर धरण व कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तसेच निवाणे, भेंडी, वरवंडी, मटाणे, वाजगाव, भउर, रामेश्वर, आदी गावांना देखील याचा लाभ होऊन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार होती.

___ उदयकुमार आहेर यांनी नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये सविस्तर पत्र लिहीत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत देवळा नगरपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस तात्काळ स्थगिती देऊन सदर काम रद्द करण्याची मागणी केली होती. यामुळे योजनेच्या कामास स्थगिती मिळून काम रखडले होते. चौकशीअंती कामावरील स्थगिती उठविण्यात आली परंतु यात मोठा कालावधि गेल्यामुळे कामाची किंमत वाढली असून ह्या कामाचा नविन प्रस्ताव तयार करावा लागणार आहे.

चार वर्षांपासून बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरील स्थगिती उठली आहे. एजन्सीची नेमणुक करून सर्व्हे करण्यात येणार असून पूर्वीची ७० लि. प्रतिमानसी ऐवजी आता १३५ लि. प्रतिमानसी नवीन योजना करण्यात येणार आहे.लवकरच सुधारीत प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यात येईल.
– प्रमोद ढोरजकर ( मुख्याधिकारी, देवळानगरपंचायत )

 

डॉ. दौलतराव आहेर व ए. टी. पवार यांच्या संयुक्त प्रयत्नातून युतीच्या काळात चणकापूर ते रामेश्वर हे 36 किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले व कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठीही पाणी मिळून परीसर सुजलाम सुफलाम झाला आहे.