Home जालना विधानसभा निवडणुकी साठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे आव्हान….

विधानसभा निवडणुकी साठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे आव्हान….

132
0

आशाताई बच्छाव

1000617689.jpg

विधानसभा निवडणुकी साठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे
माजी आमदार चंद्रकांत दानवे
यांचे आव्हान….जाफराबाद तालुका प्रतिनिधी… … मुरलीधर डहाके…...06/08/2024…. सविस्तर वृत्त असे की
भोकरदन येथे सिल्लोड रोडवरील मा.आ.चंद्रकांत दानवे साहेब यांच्या संपर्क कार्यालयात मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाच्या सर्व फ्रंटल सेलच्या तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, बूथ सदस्य, सरपंच, ग्रा.पं.स. प्रमुख कार्यकर्ते,यांची पक्षसंघटनावर भर देण्यासंबंधी अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैटकिमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आप-आपल्या बुथवरील तयारीच्या सूचना मांडल्या.

या बैठकिमध्ये मा.आ. चंद्रकांतजी दानवे साहेब यांनी बोलत असतांना सांगितले की, आगामी विधानस‌भा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्ष संघटन मजबूत करावे, लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. प्रामाणिकपणाने ते आता विधानसभा निवडणुकीत निवडुण येऊ शकत नाही त्यामुळे ते बाहेरील मतदारसंघातील त्यांच्या कार्यकत्यांचे खोटे आधार कार्ड, खोटे रहिवासी प्रमाणपत्र बनवुन बोगस मतदान आपल्या मतदारसंघात नोंदवण्याचे षड्यंत्र करत आहेत. त्यामुळे आप-आपल्या बुथवरील मतदान याद्या तपासून घेण्यात याव्या व बोगस नोंदणी आढळल्यास तात्काळा त्यावर आक्षेप घेऊन संबंधित BLO यांना धारेवर , तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन आपल्या पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे जास्तीत जास्त प्रचार – प्रसार करावा अशा सूचना केल्या,

याप्रसंगी यावेळी विधानसभा अध्यक्ष जयराम मुठ्ठे, श्री. आंबादास रगडे, युवानेते सुधाकर आण्णा दानवे, युवक तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.अंकुश जाधव सर, जिल्हासरचिटणीस प्रा.संग्रामराजे देशमुख, जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्‌मण ठोंबरे, महिला तालुकाध्यक्षा सौ. सुनिताताई सावंत, महिला उपजिल्हाउपाध्यक्षा सौ. वंदनाताई हजारे, नगरसेविका निर्मलाताई भिसे, सोनाबाई कोल्हे, छायाताई म्हस्के, शहराध्यक्ष नेमकादरी सर,मा. नगरसेवक शब्बीर कुरेशी, नसिम पठाण, अजहर शहा, अब्दुल कदीर बापु, शमीमभाई मिर्झा, मा.पं.स.स. रामदास रोडे, साहेबराव पा.दसपुते, रामेश्वर पा.जंजाळ, प्रा.अमर शेख, फैसल हाजी चाऊस, मुजीब कादरी, प्रल्हाद पा. गोरे, पंढरीनाथ पवार, रमेश पा. बरडे, डॉ.शालीकराम सपकाळ, वर्धमान शेठ वास्कर, इसरारखॉ पठाण, शाहीर नानाभाऊ परिहार, प्रल्हाद पा.लोखंडे, हबीब शेठ, अमरजित देशमुख, कडुबा तात्या देशमुख, बळीराम ठाले, ईश्वर पा.पांडे, पुंजाराम पा.साबळे, अशपाक भाई,अरुण पाटील गावंडे, मुमताज भाई मदनी, सुभाष पा.पोटे, संदीप पा. सहाने, पुंजाराम साबळे, बाबू सिंग राजपूत, दादाराव साबळे, कारभारी टिपले, अंगद पा. सहाने, पंडीतराव आगलावे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरंदचंद्रजी पवार पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous articleनंदुरबार वनविभागाच्या कारवाईस यश,
Next articleकलाबाई सखाराम शिंदे यांचे वृद्धपकाळाने निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here