आशाताई बच्छाव
जम्मू-कश्मिरमधील भ्याड हल्ल्यांच्या विरोधात
शिवसेनेची तीव्र निदर्शने
जालना, दि. १८(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या
भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जालना शहरातील देशभक्त नागरिक व शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहारातील महात्मा गांधी चौक
(चमन) येथे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या
मार्गदर्शनाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.
मागील काही महिन्यात जम्मू-काश्मिर राज्यात दहशतवाद्यांनी वारंवार हल्ले
करून देशातील नागरिक यात्रेकरू व सैनिकांना लक्ष केले आहे. त्यांच्या या
हल्ल्यात नाहक अनेक सैनिक बळी जात आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर
केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेली नाकर्तेपणाची भूमिका या
सर्वांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शहरातील गांधी
चमन येथे उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, शहर प्रमुख बाला परदेशी, विजय
पवार, गंगुताई वानखेडे, डॉ. राजेश राउत, संदीप झारकंडे, संजय रत्नपारखे,
संदीप नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत प्रचंड घोषणाबाजी करून तीव्र
निदर्शने करून निषेध करण्यात आला.
यावेळी वसीम खान पठाण, संदीप साबळे,संतोष क्षत्रिय, संदिप मगर, राजू
परदेशी, अनील अंभोरे,सखावत पठाण, जीवन खंडागळे, सोनाजी खांडेभराड,सागर
ठाकूर,रामेश्वर कुरील,महादू जाधव, संदीप जाधव, विशाल तेझाड,शाम जमधडे,
महादेव कावळे,शाम कुलथे,शेख तणवीर, नितीन जाधव, शेख सलमान, नविद काझी,
शेख फरदिन, शेख समीर, हमीद मणियार, दुर्गेश शिंदे आदी शिवसैनिक व
नागरिकांची उपस्थिती होती.
००००००००००००