Home जालना कै. गणेश मुलगे यांची डेडबाॅडी कंपनीत ठेवून ठिय्या आंदोलन करताच, मिळाला मोबदला-प्रदीप...

कै. गणेश मुलगे यांची डेडबाॅडी कंपनीत ठेवून ठिय्या आंदोलन करताच, मिळाला मोबदला-प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष

113

आशाताई बच्छाव

1000557249.jpg

कै. गणेश मुलगे यांची डेडबाॅडी कंपनीत ठेवून ठिय्या आंदोलन करताच, मिळाला मोबदला-प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक १७/०७/२०२४

याविषयी सविस्तर माहिती अशी की,खंडापुर येथिल कै. गणेश सुरेश मुलगे हे गणेश बेकरी MIDC लातुर येथे नोकरी करीत होते, आज ते कंपणीच्या कामानिमित्त भोकर जि.नांदेड येथे गेले होते.त्यांच्या गाडीचा अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला.
गणेश बेकरीचे मालक त्यांच्या आई वडीलास मोबदला देण्यास तयार नव्हते, शेवटी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी कै.गणेश मुलगे यांची डेडबाॅडी (मृतदेह) MIDC लातुर येथील गणेश बेकरी यांच्या गेट मध्ये आणुन गणेश बेकरी मालकाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.सुमारे दोन तास डेडबाॅडी उचललीच नाही.MIDC चे पोलीस निरीक्षक श्री. नरवाडे साहेब पोलीसांचा संच घेऊन घटनास्थळी आले.महीलांची युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या वेळी मौजे हारंगुळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बालाजी भाऊ कैले यांनी पुढाकार घेऊन मयत गणेश मुलगे यांच्या वडीलांना 8 लाख रुपये देण्यास गणेश बेकरी च्या मालकांना भाग पाडले.आणि विमा कंपनीकडून वेगळे पैसे देण्याचा आश्वासन देण्यात आल्या नंतर डेडबाॅडी मृतदेह उचलला. या कामी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले, माजी सरपंच संजय पाटील खंडापुरकर, दत्ता धायगुडे, तानाजी पाटील, बप्पा टेळे यांनीही पुढाकार घेतला होता.अखिल भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या प्रयत्नातून मृत व्यक्तीच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला.

Previous articleभेल प्रकल्प सुरू करण्यात यावा याकरिता 9 जुलैपासून साखळी पासून सुरू – प्रशासनाचे दुर्लक्ष
Next articleपश्चिम मुखी विश्वशनिदेव मंदिर कांलीका देवी फाटा जवळ शाबुदाना खिचडीचे वाटप .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.