Home जालना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

34
0

आशाताई बच्छाव

1000552259.jpg

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी

31 ऑगस्टपर्यंत केली तरीही लाभ जुलैपासून मिळणार

–         पालकमंत्री अतुल सावे

जालना, दि. 16 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) :-  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटच्या पात्र महिला लाभार्थ्यांपर्यत योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी नोंदणीवर भर देण्यात यावा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केली तरीही लाभ 1 जुलैपासून देण्यात येईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी बैठकीत दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तरी या ॲपवर उदभवणाऱ्या तांत्रिक समस्या तातडीने सोडविण्यासाठी जबाबदार तंत्रस्नेहीची नेमणूक करण्यात यावी. नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, महिला व बाल कल्याण विभागासह अंगणवाडी  सेविकांचे सहाय्य घेवून त्यांना प्रती दिन उद्दीष्ट देवून ग्रामीण भागातील शेवटच्या पात्र महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचें आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here