Home जालना राजमाता जिजाऊ स्कूल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथे आषाढी एकादशी...

राजमाता जिजाऊ स्कूल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

132

आशाताई बच्छाव

1000552234.jpg

राजमाता जिजाऊ स्कूल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 16/07/ 2024
आज आषाढी एकादशी-देवशयनी एकादशी निमित्त राजमाता जिजाऊ विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक संजय फलटणकर व जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन वायाळ यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा तसेच नगराध्यक्ष जाफराबाद डॉ.सौ सुरेखाताई संजयजी लहाने व जिजाऊ ग्रामीण विकास व मित्र मंडळ जाफराबाद भोकरदन चे सन्माननीय अध्यक्ष श्री संजयजी लहाने सर यांनी विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत महाराष्ट्रातील सांस्कृतिक,सांप्रदायिक व धार्मिक रित्या महत्त्वाचे समजले जाणारे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व सामाजिक परंपरा यांच्या विषयी माहिती सांगून हिंदू धर्मातील आषाढी एकादशी हा सर्वात असा महत्त्वाचा सण आहे असे सांगितले. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मातील सर्व प्रौढ व्यक्ती व नागरीक आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे वारी काढून दर्शनासाठी जात असतात.यावेळी त्यांच्यातील भक्ती व धार्मिक आवड कशा प्रकारे प्रकट होत असते याविषयी माहिती सांगितली. तसेच पायी दिंडीतील चालत असलेला प्रत्येक भाविक हा माऊली असतो व विठ्ठल रुक्मिणी विषयी आपली भावना स्पष्ट करत असतो.अशा प्रत्येक वारकऱ्याला माऊली असे म्हटले जाते असे त्यांनी सांगितले या दिंडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आजही जोपासली जात आहे. असे प्रतिपादन केले.यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान केलेली होती. तर काही विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केलेली होती व विद्यार्थ्यांनी ढोल, टाळ,मृदंग यांच्या नादावर शाळेच्या आवारामध्ये वारकरी यांची दिंडी काढून विठ्ठल रुक्मिणीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे हातात घेऊन तर काही विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरावर पाऊली खेळली काही विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी दिंडी निमित्त फुगडी खेळून दिंडीची शोभा वाढवली शाळेतील शिक्षक अमोल तेलंग्रे यांनी सूचना फलकावर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.शेवटी विद्यार्थ्यांनी गोल रिंगणामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले अशा प्रकारे राजमाता जिजाऊ विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी वारीचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री के आर घुणावत यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका सुनीता मोरे यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक विनोद उबरहांडे,अमोल तेलंग्रे,किशोर घुणावत,परशुराम पिंपळे,नवाज शेख,डी.गाडेकर,हर्षवर्धन सर,विमल एस,भागवत लहाने,विनोद धवलीया,वनिता बोडखे,रोहिणी सोळुंके,वैष्णवी पिंपळे,सविता बकाल,स्नेहल रिंढे,सुनीता मोरे, अश्विनी दुनगहु,विमल मदन,प्रभाकर रोकडे,केशव पंडितकर,बाळू चव्हाण,अंकुश जोशी, इत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleमहाएकादशी – आषाढी एकादशी
Next articleफॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये विठू नामाची शाळा भरली :
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.