आशाताई बच्छाव
पंढरपूर विठ्ठल दर्शन पायी वारी मधील सांगितलेले अनुभव -विठ्ठल भक्त रामदास बदर
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक १६ /०७/२०२४
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील बदर वाडीचे रहिवासी असलेले हरिभक्त रामदास तुकाराम बदर हे शेतकरी दरवर्षी आषाढी एकादशीला दर्शनासाठी पंढरपूरला पायी वारी करतात. त्यांनी सांगितले की, आमच्या आजोबा आणि वडील दरवर्षी वारी करायचे तीच परंपरा कायम ठेवत आमची तीसरी पिढी पायी वरीत सहभागी होऊन दर्शनाला जातो. आमच्या परिसरातील म्हसरूळ,जवखेडा ठेंग, जानेफळ , बोरगाव फदाट, खासगाव, परिसरातील अशा गावातून १००ते १५० विठ्ठल भक्त एकत्र येऊन पायी वारी प्रवास सुरू होतो. आता आम्ही पायी वारी करुण पंढरपूर दर्शनाची परंपरा कायम ठेवत आहोत. आम्ही वारीमध्ये दररोज २५ते३० किलोमीटरचा पायी प्रवास करतो . प्रवासा दरम्यान विठ्ठल भक्त दिंडीची चहा, नाष्टा, व जेवणाची व्यवस्था करतात. त्यामूळे विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूर केव्हा येते कळतच नाही.
“विठ्ठलाच्या पायी’ विट झाली भाग्यवंत.’ या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व वारकरी भाग्यवंत झाल्याचे समाधान आम्हाला पंढरपूरची वारी केल्यानंतर अनुभव येतो असल्याची प्रतिक्रिया विठ्ठल भक्त रामदास कदम यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.