Home जालना जाफराबाद तालुका अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

जाफराबाद तालुका अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

90

आशाताई बच्छाव

1000546419.jpg

जाफराबाद तालुका अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 14/07/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.कमी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आले असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. जून मध्ये पेरणी झाल्या पासुन आतापर्यंत सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.आता शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नदी,नाले, ओढे अजूनही कोरडे ठाक आहेत.कसे बसे पीक तग धरून आहेत. विहिरींना सुध्दा पाहिजेत असे पाणी आलेले नाही. त्यामूळे शेतकरी पाण्याच्या चिंतेत आहे की, पावसाचा खंड पडला तर पिक वाया गेल्या शिवाय राहणार नाही. हवामान तज्ज्ञ वेळोवेळी चुकीचे अंदाज व्यक्त करतात त्यामूळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.

Previous articleजाफराबाद तालुका अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
Next articleराज्यात आदिवासी साठी स्वातंत्र्य आयोग स्थापन केव्हा? सरकारला पडला विसर. आदिवासी विकास मंत्री लक्ष देतील का.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.