Home बुलढाणा बुलढाणा :- वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंजुरी !

बुलढाणा :- वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंजुरी !

191

आशाताई बच्छाव

1000546285.jpg

बुलढाणा :- वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंजुरी !
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ

बुलढाणा :-संपूर्ण विदर्भाचे सिंचन करू शकणाऱ्या वैनगंगा ते नळगंगा नदीजोडणी या महत्त्वाकांक्षी योजनेला शासनाची मंजुरी मिळाली आहे त्यामुळे या प्रकल्पाचा केवळ एका जिल्ह्यालाची नव्हे तर विदर्भासाठीच जीवनदायी ठरणार आहे. वैनगंगा-नळगंगा
नदीजोड प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती करण्यासाठी ९ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली व त्याला आज दि. १० जुलै रोजी राज्यपालांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे. त्यामुळे सुमारे ८०,००० कोटींच्या या प्रकल्पातून विदर्भातील सिंचनाचे चित्र पालटणार आहे. वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प विदर्भातील 6 जिल्ह्यातून जाणार असून 15 तालुक्यांना त्याचा लाभ होणार आहे. 426.542 किलोमीटर लांबीच्या कालव्या अंतर्गत 7 बोगदे असून यांची लांबी 13.83 किमी आहे तर काही ठिकाणी पाणी उचल पीडीएन व्दारे होणार असून, त्यांची लांबी 25.98 किमी व खुला कालवा हा 386.73 किमी असेल. या प्रकल्पात प्रत्यक्ष सिंचन 3 लाख 71 हजार 277 हे. असले तरी अप्रत्यक्ष सिंचन हे 5 लाख हेक्टरच्या वर पोहचणार आहे.

Previous articleकोमलने विहीरीत उडी मारुन संपविले जीवन; बुलढाणा शहरातील घटना
Next articleसंग्रामपूर तालुक्यात बंदुकीचा धाक दाखवत महिलेच्या……; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.