Home उतर महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध सामाजिक कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना चालना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध सामाजिक कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना चालना

154

आशाताई बच्छाव

1000543250.jpg

श्रीरामपूर,(दिपक कदम  तालुका प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध सामाजिक कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम मागील सहा वर्षांपासून पुजारी वस्ती येथील शाळेत अध्यापिका व अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड मॅडम राबवित आहे.दरवर्षी 12 जुलै रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अपंग सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून वाटप करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावत आहेत.युट्यूब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्नातून उत्कृष्ट नियोजन सुरू आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून ग्रामपंचायत सदस्य सौ.जयश्रीताई पुजारी यांनी केले.
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारी वस्ती यांठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, मुख्याध्यापिका हर्षदा पुजारी,अध्यापिका वर्षा गायकवाड, कु.सहर्षा साळवे,सौ लंकाबाई पुजारी,सौ.सरस्वती महाडिक, रविंद्र पुजारी,गौतम बर्डे,मोहिनी पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद पुजारी वस्ती प्राथमिक शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अतिशय अभिमानास्पद आहे.यूट्यूब च्या माध्यमातून विविध संकल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.त्याकरिता अपंग सामाजिक विकास संस्था नेहमीच आपल्या पाठीशी राहील. अशी ग्वाही अपंग सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे यांनी दिली.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हर्षदा पुजारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नक्कीच प्रेरणादायी होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी अध्यापिका वर्षा गायकवाड मॅडम यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देखील देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहिनी पुजारी, भाग्यश्री वाबळे,ओम ओहोळ,सोहम जोशी,कु.श्रीष्ठी पगारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleमेरा बुद्रुक येथील पर्वताबाई माधवराव पडघान यांचे निधन .
Next articleबीसीजी लसीकरणासाठी १०,५७२ जन इच्छुक: दर्यापूर तालुक्यातील ८१२८ व्यक्तींनी लसीकरण करण्यासाठी दिला नकार 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.