आशाताई बच्छाव
धर्मदाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने संस्थांच्या नोंदणीस प्रारंभ
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)– स्थानिक सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात ९ जुलै रोजी संस्था आणि ट्रस्टच्या ऑनलाईन नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत प्रथमच सुभेदार रामजी आंबेडकर ट्रस्ट एकतानगर रिसोड या विश्वस्त संस्थेची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले यांच्या हस्ते ऑनलाईन नोंदणी पुर्ण करुन ट्रस्टचे अध्यक्ष अलंकार खैरे यांना ऑनलाईन नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी अभिवक्ता व चॅरिटी बार असोसिएशनचे सचिव अॅड. कुणाल कान्हेड, अधिक्षक रघुनाथ गिरे यांच्यासह धर्मदाय कार्यालयातील कर्मचारी आणि चॅरिटभ बार असोसिएशनचे वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.