Home बुलढाणा होते रेती,महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने केली कारवाई, कारवाईत सात टिप्पर जप्त..

होते रेती,महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने केली कारवाई, कारवाईत सात टिप्पर जप्त..

75
0

आशाताई बच्छाव

1000535419.jpg

होते रेती,महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने केली कारवाई, कारवाईत सात टिप्पर जप्त..
अंढेरा :- बुलढाणा रेती माफी यांना पकडण्यासाठी महसूल व पोलीस डिपार्टमेंट संयुक्त पथकाने आठ जुलै च्या रात्री ऑपरेशन जप्त केले सविस्तर वृत्त अशे की खडकपूर्णा नदीच्या पात्रातून उत्खनन करून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतुक करण्यात येत आहे रेती माफीयांना चाप लावण्यासाठी महसूल आणि पोलिसांच्या पथकाने ८ जुलै रोजी रात्री ऑपरेशन राबवून सात टिप्पर जप्त केले. याप्रकरणी टिप्पर मालकांवर कारवाई करण्यात आली.
खडकपूर्णा नदीच्या पात्रातून उत्खनन करून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. महसूल विभाग सातत्याने कारवाई करीत असले, तरीही उत्खनन सुरूच आहे. ८ जुलैच्या रात्री चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे, तसेच महसूलचे कर्मचारी आणि अंढेराचे ठाणेदार विकास पाटील यांनी संयुक्तपणे ऑपरेशन राबवत इसरूळ येथील बस स्थानकावर सात टिप्पर जप्त केले. यापैकी पाच टिप्परमध्ये रेती भरलेली होती, तर दोन टिप्पर खाली होते.
या टिप्परवर कारवाई केली आहे.

कारवाही केलेल्या टिप्परची नंबर :-१) टिप्पर क्रमांक एमएच २८ एबी ६७७४
२) एमएच २८ बीबी ७५५६३) एमएच २८ एबी ७८६३४) एमएच २८ एबी ७६३६ ५) एमएच २८ बीबी ६७२७ या नंबरच्या वाहनांमध्ये रेती भरलेली होती
एमएच २८ बीवाय ४९४८ व बीबी २७९८ हे खाली टिप्पर पोलिसांनी जप्त केले.
याप्रकरणी कार्यवाही
केलेले व्यक्तींची नावे:-
१) उद्धव भगवान जेठे
२) आसाराम मुकिंदा कुसळकर,
३) गणेश मधुकर घोटे,
४) गणेश घोटे, कैलास
५) सखाराम पायघन,
६) अंकुश विष्णू इंगळे
७) रामेश्वर पंजाबराव सोळंकी
८) राजू आनंदा खरे
९) ज्ञानेश्वर अंबादास घुबे
१०) शेख रशीद
११) अमोल राजू मुनमुले
१२) पंजाब दिनकर घुबे
१३) आनंदा विष्णू धायडे या रेती चालक मालकांवर या पथकाने केली कारवाई.
तहसीलदार संतोष याकडे, अंढेरा ठाणेदार विकास पाटील, भगवान पवार मंडळ अधिकारी चिखली,तलाठी सुनील ढवळे, तलाठी नितीन काळे, चालक संतोष भोपळे व पोहेकाँ भरत पोफळे,तलाठी योगेश भुसारी,पोलिस कॉन्स्टेबल पोहरे, नितीन पुसे, चालक राज पवार यांनी हि कारवाई केली आहे.

Previous articleराज्याच्या अर्थसंकल्पात आमदार गायकवाड यांचाच दबदबा,अर्थसंकल्पात बुलढाण्याला मिळाले 25 कोटी 30 लाख….
Next articleपोलिस भरतीसाठी शनिवारी लेखी परीक्षा लेखी परीक्षेसाठी 1 हजार 366 उमेदवार पात्र…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here