Home बुलढाणा रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुव्याला यश; बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम...

रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुव्याला यश; बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात…

17
0

आशाताई बच्छाव

1000532211.jpg

रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुव्याला यश; बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :-रविकांत तुपकर यांनी केलेले आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. रब्बी हंगामात झालेल्या पिक नुकसानीचा पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.परंतु कमी शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा करून कंपनीने शेतकऱ्यांची बोळवण करू नये, संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविम्याची रक्कम जमा करावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीचा पिकविमा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून रविकांत तुपकरांनी सातत्याने आंदोलने केली होती. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे केलेले अन्नत्याग आंदोलन व त्यानंतर मुंबई येथील मंत्रालय ताबा आंदोलन व त्यावेळी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा देण्याची मागणी मान्य झाली होती.
परंतु रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांसह रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा नागपूर अधिवेशनावर धडक दिली होती. त्यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा देण्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर पिकविम्याची काही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पण हजारो शेतकरी पिकविम्यापासून वंचित होते. त्यामुळे रविकांत तुपकरांनी दि.१२ जून २०२४ रोजी पुन्हा एकदा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून पिकविम्याची मागणी लावून धरली व प्रधान सचिव (कृषि) यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश आले असून यामुळे काही ना काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Previous articleदूर्गसृष्टीच्या जिर्णोध्दारासाठी स्थानिक नागरिकांनीच एकवटण्याची गरज निर्माण झाली आहे.
Next articleभंडारा जिल्हा सरपंच संघटनेचा भेल प्रकल्पग्रस्त उपोषणाला पाठिंबा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here